
नवीन वर्ष म्हणजे नवीन वर्ष किंवा नवीन दिनदर्शिका सुरू होण्याची वेळ किंवा दिवस. या दिवसापासून वर्षाची मोजणी एका अंकाने वाढते.
बर्याच संस्कृतीत हा कार्यक्रम काही प्रमाणात साजरा करतात. सर्वत्र सध्या प्रचलनात असलेल्या ग्रेगरीय दिनदर्शिकेत, १ जानेवारी हा दिवस नवीन वर्षची सुरुवात म्हणून चिन्हांकित केला जातो. जुलियन दिनदर्शिका आणि रोमन दिनदर्शिकेत पण १ जानेवारी हाच नवीन वर्षाचा दिवस होता.
इतर संस्कृती त्यांचा पारंपारिक किंवा धार्मिक नवीन वर्षांचा दिवस त्यांच्या स्वतःच्या रूढीनुसार पाळतात आणि कधीकधी नागरी दिनदर्शिकेतील (ग्रेगोरियन) १ जानेवारी हा दिवस पण साजरा करतात. चीनी नववर्ष, इस्लामिक नवीन वर्ष, पारंपारिक जपानी नवीन वर्ष आणि ज्यू नवीन वर्ष (रोश हशाना) ही अधिक सुप्रसिद्ध उदाहरणे आहेत. भारतात आणि इतर देशांत वेगवेगळ्या तारखांवर नवीन वर्ष साजरे करतात. भारतातील अनेक राज्यांत पण नवीव वर्षाचे दिवस वेगवेगळे आहेत.
मराठी, कोंकणी व काही कन्नड भागांमध्ये हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच गुढीपाडवा हा नवीन वर्षाचा दिवस म्हणुन साजरा होतो.
भारत
भारतात अनेक राज्यांत नवीव वर्ष वेगवेगळ्या दिवशी साजरा होतो. पंजाबी / शीख धर्मातील लोक बैसाखी या त्यांच्या नानकशाही दिनदर्शिकेनुसार १३ किंवा १४ एप्रिल रोजी नवीन वर्ष साजरा करतात. तमिळ कालदर्शिकेनुसार पुथंडु किंवा पुथुवरुषम पासून नवीन वर्षारंभ होतो जो १३ किंवा १४ एप्रिल या दिवशी साजरा केला जातो. नमीळनाडूतील विविध मंदिर आणि घरांमध्ये उत्सव आयोजित केला जातो. घरांच्या अंगण कोलमनी (रांगोळी) सजवले जाते. हिमाचल प्रदेश मधील डोगरा लोक चैत्र महिन्यात त्यांचे नवीन वर्ष चैत्य साजरे करतात. आसाम मध्ये रोंगाली बिहू हा एप्रिल मध्ये येणारा नवीन वर्षाचा दिवस आहे.
बंगाली बांधव हे पहेला वैशाखला साजरा करतात. हा बांगलादेशातील राष्ट्रीय सुट्टी म्हणून १४ एप्रिल रोजी साजरा केला जातो आणि १४ किंवा १५ एप्रिल रोजी पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि आसामच्या काही भागांमध्ये बंगाली परंपरा असणाऱ्या लोकांमध्ये धार्मिक धर्मनिरपेक्ष साजरा होतो. केरळ राज्यात विषु हा सण साजरा होतो. कर्नाटक मधील मंगलोर आणि तुलू भाषीक लोक पण विषु साजरा करतात. मराठी, कोंकणी व काही कन्नड भागांमध्ये गुढीपाडवा हा नवीन वर्षाचा दिवस म्हणुन साजरा होतो. मारवाडी व गुजराती लोक दिवाळी पासून नवीन वर्ष सुरू करतात.
सिंधी नव वर्षाची सुरवात चेटीचंड उत्सवापासून होते. पारशी धर्मात नववर्ष नवरोजच्या रुपात साजरे केले जाते.
कोणत्या धर्मामध्ये नवीन वर्षाची सुरवात केव्हा होते .
नविन वर्षाची सुरवात प्रत्येक धर्मात वेगवेगळ्या वेळी आणि निरनिराळ्या प्रथेने केली जाते. एखाद्या धर्मात गाणे गाऊन, नृत्य करुन तर काही ठिकाणी पुजा-पाठ करुन नविन वर्षाच स्वागत केले जाते. जगात सर्वात जास्त ईसाई पद्धतीने नवीन वर्ष साजरे करण्याची परंपरा आहे. ईसाई वर्ष हे 1 जानेवारी ते 31 डिसेंबरपर्यंत असे 12 महिन्यात विभागलेले असते.
ईसाई नविन वर्ष
वर्ष 21 मार्चला साजरे केले जायचे, याच दिवशी वसंत ऋतूला सुरवात होते असेही मानले जाते. जेव्हा हुकूमशाह ज्युलियस ईसाई लोक 1 जानेवारीला नवीन वर्ष साजरे करतात. जवळजवळ 4000 वर्षांपूर्वी बेबीलोनमध्ये नवीन या रोमन सम्राटाने इ.स.पु.र्व. 45 साव्या वर्षी ज्युलियस कॅलेंडरची स्थापना केली. तेव्हा जगात पहिल्यांदा 1 जानेवारीला नविन वर्षचा उत्सव साजरा केला गेला. हे सर्वधिक प्रचलित नवीन वर्ष आहे.
हिंदू नववर्ष
हिंदू नववर्षाची सुरवात चैत्र महिन्याच्या शुक्ल प्रतिपदेपासुन होते. याला हिंदू नवीन संवत्सर किंवा संवत असेही म्हणतात. याच दिवसापासुन ब्रह्मदेवाने विश्वाच्या नर्मितीला सुरवात केली, असेही सांगितले जाते. याच दिवसापासुन विक्रम संवतच्या नवीन वर्षाची सुरवात होते. इग्रंजी कॅलेंडरप्रमाणे ही तारीख एप्रिल महिन्यात येते. हा उत्सव गुढीपाडवा नावाने भारतातील विविध भागात साजरा केला जातो.
सिंधी नवीन वर्ष
सिंधी नव वर्षाची सुरवात चेटीचंड उत्सवापासून होते. हा उत्सव चैत्र शुक्ल द्वितीयेला साजरा केला जातो. सिंधी मान्यतेनुसार याच दिवशी वरूणराजाच्या अवतारातील भगवान झुलेलाल यांचा जन्म झाला.
शीख नवीन वर्ष
पंजाबमध्ये नवीन वर्षाचे स्वागत बैसाखी उत्सव साजरा करुन केले जाते. हा सण एप्रिल महिन्यात येतो. शीख नानकशाही कॅलेंडरनुसार होळीच्या दुस-या दिवसापासून नवीन वर्षाची सुरवात होते.
जैन नवीन वर्ष
जैन नववर्ष दिवाळीच्या दुस-या दिवसापासून सुरू होते. महावीर स्वामींच्या मोक्ष प्राप्ती दिवसाच्या दुस-या दिवसापासुन जैन नववर्षाला सुरवात होते. याला वीर नर्वाण सवंत असेही म्हणतात.
पारशी नवीन वर्ष
पारशी धर्मात नववर्ष नवरोजच्या रुपात साजरे केले जाते. 19 ऑगस्टला पारशी लोक नवरोजचा सण साजरा करतात. 3000 वर्षांपूर्वी शाह जमशेदजी यांनी पारशी धर्मात नवरोज साजरा करण्यास सुरवात केली. नव म्हणजे नवीन आणि रोज म्हणजे दिवस, असा नवरोज चा अर्थ आहे.



